Ad will apear here
Next
‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’
‘कमलदूत’चे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
‘कमलदूत’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मान्यवर.

पुणे : ‘समाजमाध्यमांमुळे वाचनसंस्कृतीचे स्वरूपही बदलत आहे. हा बदल सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारा असला पाहिजे. त्यासाठी सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘कमलदूत’ दीपावली विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ ३१ ऑक्टोबर २०१८ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. लोहगाव विमानतळावरील अतिथीगृहात हा छोटेखानी सोहळा पार पडला. या प्रसंगी ‘कमलदूत’चे संपादक व पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता युवा मोर्चाच्या स्वरदा केळकर उपस्थित होत्या.

फडणवीस म्हणाले, ‘अक्षराच्या सादरीकरणाचे माध्यम बदलल्याने संपर्काचा वेग झापाट्याने वाढत आहे. नव्या तंत्रज्ञानाने ज्ञानाची कवाडे विस्तारली आहेत. देशोदेशीच्या सीमा ओलांडून जनसामान्यांची मतमतांतरे जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचत आहे. ही क्रांती गतीमान आहे. साक्षरतेचा वेग वाढविण्यासाठी त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. मराठी साहित्यातील दिवाळी अंकांनी साहित्य विश्व उजळवून टाकले आहे. त्याला फार मोठी परंपरा इतिहास आहे. हे अंक आता डिजिटल स्वरूपात सर्व भाषांमध्ये जायला हवेत. मायमराठीचा सन्मान त्यामुळे वृद्धिंगत होईल.’

तब्बल बावीस वर्षे ‘कमलदूत’ पाक्षिक प्रकाशित होत असल्याचा संदर्भ देत पालकमंत्री बापट म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पाक्षिक सुरू झाले. आता कसबा मतदारसंघात ‘कमलदूत’ ही वाचकांची चळवळ झाली आहे. या चळवळींने लोकशिक्षणाचे काम हाती घेतले आहे. यंदा प्रथमच दीपावलीच्या निमित्ताने संचित हा विषय ‘कमलदूत’ने हाताळला आहे.’

विंदा करंदीकर, ग. दि. माडगुळकर, बाबुजी फडके, पु. ल. देशपांडे, अनंतराव भालेराव, राजारामबापू पाटील यांसारख्यांचा प्रभाव असणाऱ्या अनेक दिग्गजांनी या अंकात योगदान दिले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, संगीतकार प्रभाकर जोग, अविनाश सोवनी, सुधन्व रानडे,  नितीन गडकरी, डॉ. नीलम गोऱ्हे, निशिकांत भालेराव, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, राहुल सोलापूरकर, पोपटराव पवार, सतीश मगर, झेलम चौबळ आदींचा समावेश आहे. स्वरदा केळकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYYBU
Similar Posts
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
‘खासदारपदामुळे विकासाची जबाबदारी वाढली’ पुणे : ‘राजकारणातील प्रगतीसाठी नव्हे, तर केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेत गेलो आहे. नगरसेवक, आमदार आणि मंत्री म्हणून पुण्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो. यातून काही प्रश्न मार्गी लावले; पण आणखी बरेच करायचे आहे. त्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी
लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन उत्साहात पुणे : अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे दोन दिवसीय महाअधिवेशन पुण्यातील मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे उत्साहात झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language